Mahavitran Nagpur | महावितरणच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

नागपूर जिल्ह्यातील सावरगाव परिसरात महावितरणच्या अधिकाऱ्यांवर पती पत्नीने मिळून लाकडी काठी व दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

MSEDCL officials attacked

नागपूर: थकीत वीज बिल वसुली आणि जुने मीटर बदलण्याच्या मोहिमेवर गेलेल्या महावितरणच्या पथकावर नागपूर जिल्ह्यातील सावरगाव परिसरात एका ग्राहकाने आणि त्याच्या पत्नीने मिळून लाकडी काठी व दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १०) घडली. या हल्ल्यात सहाय्यक अभियंता जखमी झाले असून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महावितरणचे सहाय्यक अभियंता सोपान उकंडराव गायधने (वय ५०) हे आपल्या सहकाऱ्यांसह सावरगाव येथील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये थकीत वीज बिल वसुली आणि मीटर बदलण्याचे काम करत होते. यावेळी मौजू शेरखा पठाण (वय ६७) यांच्या घरी गेले असता, पथकाने त्यांना मागील महिन्याचे थकीत बिल भरण्याची विनंती केली. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगताच मौजू पठाण संतप्त झाले.

crime news
Nagpur Crime News | नागपुरात खळबळ! खैरी पुलाजवळ आढळला कुजलेला मृतदेह; घातपाताचा दाट संशय

रागाच्या भरात मौजू पठाण यांनी घरातून लाकडी काठी आणून अभियंता सोपान गायधने यांच्या उजव्या हातावर प्रहार केला, ज्यामध्ये ते जखमी झाले. याचवेळी त्यांची पत्नी मुमताज पठाण (वय ५५) हिने मागून येत गायधने यांना मारहाण करत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, मौजू पठाण यांनी पथकातील दुसरे अधिकारी आनंद प्रभुदयाल जयस्वाल यांच्या दिशेने मोठा दगड फेकून मारला. हा दगड जयस्वाल यांच्या हातातील घड्याळ आणि मोबाईलवर लागल्याने त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

सोपान गायधने यांनी सावरगाव पोलीस चौकीत या घटनेची सविस्तर तोंडी तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपी मौजू पठाण आणि मुमताज पठाण यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news