Nagpur Accident: नागपूरमध्ये मद्यधुंद जवानाचा प्रताप; भरधाव वाहनाने 25 ते 30 नागरिकांना कट मारली, जमावाने दिला चोप

Ramtek Taluka: रामटेक तालुक्यातील नगरधन येथे रविवारी रात्री वाघमारेने रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला.
Nagpur Accident
Nagpur AccidentPudhari
Published on
Updated on

नागपूर: सुट्टीवर आलेल्या एका मद्यधुंद लष्करी जवानाने रामटेक तालुक्यातील रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. भरधाव आणि बेधुंदपणे कार चालवत या जवानाने रस्त्यावरील सुमारे २५ ते ३० नागरिकांना कट मारल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. संतप्त गावकऱ्यांनी जवानाला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Nagpur Accident
MNS Style Protest Nagpur | पुन्हा एकदा मनसे स्टाईल आंदोलन; नागपुरात नासुप्र अधिकाऱ्याला काळे फासले

हर्षपाल वाघमारे हा भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असून काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर आपल्या गावी आला होता. रामटेक तालुक्यातील नगरधन येथे रविवारी रात्री वाघमारेने रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला. हर्षपाल हा मद्यपान करून कार चालवत होता. नगरधन गावातील साई मंदिर मार्गावरून गावाकडे जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील नागरिकांना कट मारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.

Nagpur Accident
Nashik Crime: दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या, बेंचवर बसवण्यावरून वाद; 2 जणांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची कार परिसरातील एका झाडाला धडकून नाल्यात कोसळली. यात हर्षपाल जखमी झाला. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाच्या तावडीतून हर्षपाल वाघमारे याची सुटका करून त्याला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news