

Minor girls abuse issue
नागपूर : मालेगावमध्ये लहान मुलींसोबत अत्याचाराच्या घटना वाढत असून दोषींना तातडीने कडक शासन व्हावे, अशी मागणी मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांनी केली. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारकडे लक्ष वेधण्यासाठी विधानभवन परिसरात त्यांनी फलकही झळकावले.
मालेगावमध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली आहे. यात एका लहान बालकालाही जीव गमवावा लागला. दोन वर्षांपूर्वी मोहम्मद नावाच्या दोन वर्षाच्या मुलाचे किडनॅप करून त्याची हत्या करण्यात आली होती. आज समाजात लहान मुले व मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात कडक कायदे तयार करून बलात्कारी व हत्या करणाऱ्यांवर ठोस कारवाई व्हायला हवी यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना भर दिला .
दरम्यान, नागपुरात बिबट्याने मानवी वस्तीत घुसून बुधवारी (दि.१०) केलेल्या हल्ल्यानंतर आज विधानभवन परिसरातही बिबट्या लक्षवेधी ठरला. शिवसेना आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्यासारखाच पेहराव करीत राज्यातील बिबट्यांचे वाढते हल्ले आणि मृत्यूच्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले.