

नागपूर : मध्यप्रदेशमधून सावळी मार्गाने सुरू असलेल्या अवैध रेती, सुपारी वाहतुकीचा सावनेरचे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलवद रोडवर भांडाफोड केला आहे. रॉयल्टी वाचवणे, ओव्हरलोड ट्रक चालवणे, टोल वाचवणे अशी अवैधरित्या कामे वर्षानुवर्षे सुरू असल्याचे यानिमित्ताने निदर्शनास येत आहे.
सडलेल्या सुपाऱ्या घेऊन ही वाहतूक होत असताना त्यासोबतच तंबाखू असण्याचा संशयही व्यक्त केला जात असून याप्रकरणी पोलिस सखोल तपास करीत आहेत.महाराष्ट्राची लाखो रुपयाची रॉयल्टी व कर चुकवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस विभागाच्या माध्यमातून होणार आहे. सडलेली सुपारी विकण्याचा जो प्रयत्न आहे, त्यासाठी फूड अँड ड्रग्स विभागाच्या वतीने आम्ही कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही,असे आशिष देशमुख यांनी यावेळी सांगितले.