Nagpur Parswani Family | बेपत्ता झालेले 5 जणांचे परसवानी कुटुंब नातेवाईकांकडे सुखरूप

परसवानी कुटुंब अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे सुखरूप आढळल्याने धंतोली पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला
Nagpur Missing Family Case
Nagpur Missing Family CasePudhari
Published on
Updated on

Parswani Family Safe in Pimpri Chinchwad

नागपूर: लोकांच्या कर्जाचा कोंडमारा चुकविण्यासाठी रहस्यमरीत्या बेपत्ता झालेले धंतोलीतील दुर्गा सदन येथील 5 सदस्यीय परसवानी कुटुंब अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे सुखरूप आढळल्याने धंतोली पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.

डेली निड दुकान असताना त्यांच्यावर लाखोंचे कर्ज झाले. कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावल्याने हर्षा सुरेश परसवानी, जितेंद्र सुरेश परसवानी, ईशिता जितेंद्र परसवानी, खुशी जितेंद्र परसवानी आणि कृष्णा जितेंद्र परसवानी (सर्व रा. दुर्गा सदन ) ही मंडळी घर सोडून निघून गेली. मोबाइल बंद ठेवला. यादरम्यान पाचही जण बेपत्ता झाल्याचा माहिती समोर आल्याने खळबळ माजली होती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news