नागपूर : महसूल गुप्तचर यंत्रणेकडून मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश

78 कोटींचा माल जप्त; तीन संशयितांना अटक
Mefedron Making In Nagpur
मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाशPudhari File Photo
Published on
Updated on

नागपूरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या अंमली पदार्थ मेफेड्रोनचे उत्पादन सुरू होते. या गोष्टीचा मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूने नागपूर पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. शनिवारी (दि.10) करण्यात आलेल्या या कारवाईत सुत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली. यावेळी 78 कोटींचा 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात माल जप्त करण्यात आहे. तसेच यासोबतच कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत.

Mefedron Making In Nagpur
मोठी बातमी! नालासोपाऱ्यात तब्बल १४०० कोटी रुपयांचे ७०० किलो मेफेड्रोन जप्त

या करखान्या विषयीची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी (दि.10) शोध मोहीम राबविण्यात आली. मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज एक छोटी प्रयोगशाळा या इमारतीत उभारण्यात आली होती. मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीने प्रथम या यंत्रसामूग्रीचा संच खरेदी केला. तसेच प्रयोगशाळा उभारली तसेच 100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल देखील जमा केला होता.

या टोळीने आधीच द्रव स्वरूपातील 50 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते. क्रिस्टलाइज्ड अथवा पावडर स्वरूपातील उत्पादन तयार करण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. यावेळी सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले असून यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत मेफेड्रोन हा मनावर नकारात्मक परिणाम करणारा पदार्थ आहे.

Mefedron Making In Nagpur
पुणे : मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले

या टोळीचा म्होरक्या किंवा भांडवलदार आणि मेफेड्रोन उत्पादनात गुंतलेल्या त्याच्या तीन साथीदारांना अमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठविण्यात आले आहे. या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूला नागपूर पोलिसांचेही सहकार्य मिळाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news