Nagpur Crime | ‘तुम्हाला आवडते ती साडी घालून मी सजली आहे...‘ चिठ्ठी लिहली आणि मयुरीने घेतला गळफास, काय आहे चिठ्ठीत?

मृत विवाहितेच्या सुसाईड नोटवरुन पतीला अटक, नवरा बायकोच्या वादविवादाने गाठले अखेरचे टोक
Nagpur Crime
Nagpur Crime
Published on
Updated on

नागपूर - पती पत्नीमधील वादाचे पर्यवसान विवाहितेच्या आत्महत्येत झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, तुम्हाला आवडते ती साडी घालून मी सजली आहे. उद्या सुट्टी आहे. सुटी काढायची गरज नाही..मला भेटायला या...! अशी अखेरची भावनिक साद घालत एका विवाहितेने गळफास घेतल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोराडी महादुला परिसरात उघडकीस आली आहे.

मयुरी मेंढे असे या मृतक विवाहितेचे नाव असून पतीचे नाव संदीप मेंढे असे आहे. संदीप यास पोलिसांनी मयुरीच्या कुटुंबियांनी केलेली तक्रार आणि मयुरी हिने स्वतः लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे अटक केली. दोघांमध्ये वारंवार वादविवाद होत असल्याने मयुरी माहेरी आली. पतीला एक दीड महिन्यापासून समजवण्याचा प्रयत्न करूनही तो समजत नाही. माझे तुमच्यावर प्रेम आहे. पण तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही. आता सुटी काढण्याची गरज नाही. उद्या रविवार आहे... आता शेवटचे भेटायला या, असेही भावनिक संदर्भ या चिठ्ठीत असून या घटनेने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news