

Nagpur Zingabai Takli fire
नागपूर : झिंगाबाई टाकळी परिसरातील एका मंडप डेकोरेशन च्या गोडाऊनला आग लागल्याने लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार-पाच बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
प्लॉट क्र. 159 येथे बाबा बगदादिया नगर, झिंगाबाई टाकळी परिसरात हे मंडप बिछायत डेकोरेशनचे गोडाऊन असून आग लागल्याची माहिती कळताच परिसरात एकच धावपळ उडाली. महापालिका अग्निशमन विभागाच्या कळमना, गंजीपेठ, सिव्हिल लाईन्स व सुगत नगर येथील अग्निशमन केंद्रातील फायर टेंडर तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्यास्थितीत आगेवर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली.