

नागपूर : महापालिका निवडणूक साठी प्रभागनिहाय आरक्षण निघाल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडघे ज्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांना आरक्षणाचा मोठा धक्का बसला आहे. याशिवाय स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे बाल्या बोरकर, नागेश सहारे, मीनाक्षी तेलगोटे, प्रमोद तभाने,संजय बालपांडे, बसपचे जितेंद्र घोडेस्वार, संजय बुरेवार अशा अनेक माजी नगरसेवकांना धक्का बसला.
शहरात एकूण 38 प्रभाग आहेत. या चार सदस्य 37 प्रभागात तर शेवटचा 38 क्रमांकाच्या प्रभागात केवळ तीन सदस्य आहेत. यापूर्वी 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. आता आठ वर्षांनी निवडणूक होत असल्याने अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रफुल गुडधे यांच्या प्रभाग 38 मध्ये दोन जागा महिलांसाठी तर एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे. आपण लढणार नाही कार्यकर्ते तयार आहेत. तीनही जागा आम्ही ,काँग्रेस उमेदवार जिंकू असा दावा त्यांनी केला. बाल्या बोरकर यांच्या प्रभाग 23 मध्ये ओबीसी महिला आरक्षण आले. या प्रभागात 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे निवडून आले होते. त्यामुळे बोरकर विरुद्ध पेठे अशी लढत होऊ शकते.
काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे प्रभाग 9 आणि 13 मधून तयारी करत होते त्यांनाही आता स्वतंत्र प्रभाग शोधावा लागणार आहे. दरम्यान विकी कुकरेजा, मनोज सांगोळे ,संदीप सहारे, प्रवीण भिशीकर,संदीप जाधव, परिणीता फुके, संजय बंगाले ,दयाशंकर तिवारी, आभा पांडे ,चेतना टाक, पुरुषोत्तम हजारे, तानाजी वनवे, धर्मपाल मेश्राम, किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, अविनाश ठाकरे या उमेदवारांचे प्रभाग सुरक्षित राहिले आहेत.