

नागपूर - महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी व माजी गृह राज्यमंत्री भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांनी शहरात जाहीर सभांनी प्रचारात मोठी रंगत आणली.
महानगरपालिका मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारच महापौर होईल असे प्रतिपादन करून "भाजपाच्या संगे चले नागपूर नगरिया" असा नारा देत तिवारी यांनी आपल्या प्रसिद्ध गीतांनी आणि आक्रमक भाषणांनी जनतेला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्व सभांमध्ये नागपूर शहरात गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. "काठी अन घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की र" हे मराठी गीत गाऊन त्यांनी मन जिंकले. आपल्या विशेष शैलीत त्यांनी 'यूपी के भैया है जी, नागपूर के आभारी है जी' हे गीत सादर करून नागपूरकरांशी जिव्हाळ्याचे नाते सांगितले.