

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (शनिवार) नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत काँग्रेसवर केलेल्या अनेक आरोपांना खर्गे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
विमानाने नागपूर येथे आल्यावर पवित्र दीक्षाभूमी येथे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, मुन्ना ओझा, नाना गावंडे आदी अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सभेला संबोधित करुन सायंकाळी ६ वाजता उत्तर नागपुरातील ऐतिहासिक इंदोरा मैदानात प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. यानंतर ते रात्रीच्या विमानाने मुंबईला परत जाणार आहेत.