नागपुरात एशियन फायर वर्क्समध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू, तीन जखमी

परिसरातील जंगलातही लागली आग
Major explosion at an ammunition company in Kotwalbaddi, Katol taluka, two people died
नागपुरात एशियन फायर वर्क्समध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू, तीन जखमी Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) दीड वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. या भीषण स्‍फोटात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर तीन कामगार जखमी असून त्यांना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर - काटोल रोडवरील कोतवालबर्डी येथे ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे. फटाके निर्मिती करणाऱ्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हर मध्ये बारुद भरुन त्याचे फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत.

जखमी कामगारांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात व नंतर नागपुरात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस अधिक तपास करीत असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीसचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर, काटोल नगरपालिकांतून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या. ॲम्बुलन्स देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आल्या. या स्फोटामागचे कारण नेमकं काय यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले दोघेही मध्यप्रदेश मधील शिवनी येथील रहिवाशी होते. या घटनेतील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news