हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्‍याच दिवशी मविआचे EVM विरोधात आंदोलन

ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, विरोधक आक्रमक
Mahavikas Aghadi protests against EVMs on the first day of the winter session
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्‍याच दिवशी मविआचे EVM विरोधात आंदोलनFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवार) महाविकास आघाडी सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. गेले काही दिवस EVM विरोधात सातत्याने राज्यभरात विरोधकांकडून आंदोलन केले जात आहे. राज्यात आलेले फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार EVM मुळे सत्‍तेवर आले आहे. त्या विरोधात आंदोलन असल्याची भूमिका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

यावेळी EVM सरकार हाय-हाय EVM हटवा, लोकशाही वाचवा अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. यावेळी अंबादास दानवे व इतर सदस्य सहभागी झाले होते. ईव्हीएमवर निवडणुका बंद करा अशी महाविकास आघाडीची मागणी होती. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी म्हणून ईव्हीएमवर निवडणूक घेणे बंद करा अशी मागणी माहविकास आघाडीच्या आमदारांनी केली. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएम बंद करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news