11th class start date: राज्यातील ११ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू; शिक्षण संचालकांचे निर्देश

Maharashtra Education news: निवड झालेल्या विद्यार्थिनींना १३ आणि १४ जुलै रोजी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतील
11th class start date: राज्यातील ११ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू; शिक्षण संचालकांचे निर्देश
Published on: 
Updated on: 

नागपूर : विविध ज्युनियर कॉलेजांमधील 11 वी वर्ग येत्या बुधवार, १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. शिक्षण संचालनालयाने याबाबत घोषणा केली. राज्यात अकराव्या वर्गातील प्रवेशांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. शून्य फेरीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत विविध फेऱ्या राबविण्यात आल्या.

11th class start date: राज्यातील ११ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू; शिक्षण संचालकांचे निर्देश
FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मुलींसाठी विशेष फेरी जाहीर; 10 ते 11 जुलै अर्जाची संधी

या फेऱ्यांनंतर शुक्रवारी मुलींसाठीच्या विशेष फेरीला प्रारंभ झाला. शुक्रवारी आणि शनिवारी ही विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. हे दोन दिवस मुलींना नोंदणी करता येईल. त्यानंतर १२ जुलै रोजी कॉलेजांचे अलॉटमेंट जाहीर केले जाईल.

11th class start date: राज्यातील ११ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू; शिक्षण संचालकांचे निर्देश
FYJC Admission Third Round: अकरावी प्रवेश तिसऱ्या फेरीत १.४९ लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

निवड झालेल्या विद्यार्थिनींना १३ आणि १४ जुलै रोजी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतील. त्यानंतर, १४ जुलै रोजी पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग शुक्रवारपासून सुरू होतील. त्यानंतर १६ जुलै रोजी पुन्हा एकदा रिक्त राहिलेल्या जागांची यादी जाहीर केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news