महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख; नामकरणास मान्यता

शासन निर्णय जाहीर
महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख; नामकरणास मान्यता
File Photo
Published on
Updated on

नागपूर : राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आता महापुरुष, सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे देण्यात आली असून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे आणि खाजगी औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यात 419 शासकीय व 585 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्व संस्थांना निर्देश दिले आहेत. याचबरोबर प्रशिक्षण संस्थेच्या नावातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी विविध महनीय व्यक्तीमत्वांची नावे देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यात नागपूर जिल्ह्यातील 8 संस्थांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.

हिंगणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता श्री संत गमाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळमेश्वर नागपूर येथील स्व. आप्पा साहेब हळदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुही येथील श्री संत रुख्खड महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नरखेड येथील श्री अमृत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावनेर येथील स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरेड येथील स्व. भैयाजी दाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, काटोल येथील महर्षी पंतजली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलदा येथील चित्तूर सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने आता ओळखल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news