

नागपूर - समृद्धी महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील वायफळ टोल नाक्याजवळ तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने अविरत परिश्रमातून सुखरूप सुटका केली. वायफळ टोलजवळ वन्यजीवांसाठी बनवलेल्या अंडरपासला लागून असलेल्या शेताच्या कुंपनाच्या तारेत हा बिबट्या अडकला होता.
याविषयीची माहिती मिळताच नागपुरातील गोरेवाडा येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरची संपूर्ण रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. बिबट्याला फिजिकल रेस्क्यू कॅचपोलच्या साहाय्याने त्याचे समोरील पाय आणि मान फिक्स करुन वर समृद्धी मार्गांवर असलेल्या ऍम्ब्युलन्समध्ये आणण्यात आले. किरकोळ जखमी असल्याने बिबट्याला ट्रांझिट ट्रीटमेंट सेन्टरला उपचारासाठी दाखल करण्यात आले. राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात या बिबट्याचे रेस्क्यु ऑपरेशन झाले.