

Nagpur wild animal rescue
नागपूर : नागपुरातील दाट वस्ती असलेल्या पारडी क्षेत्रातील शिवनगर परिसरातील एका घरात बुधवारी (दि.१०) सकाळी बिबट्या शिरल्याने नागरिक दहशतीत होते. तातडीने या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
त्यापूर्वी चार ते पाच लोकांना या बिबट्याने जखमी केले. त्यांना पारडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातवरण पसरले होते.
घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला असून माहिती मिळताच वनविभाग पोलीस आणि पिंजऱ्यासह रेस्क्यू टीम दाखल झाली. यापूर्वी मनपाच्या 5 नंबर नाक्याजवळ सोमवारी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिक दहशतीत होते.
मात्र, दिवसभर शोध लागला नव्हता. यापूर्वी भांडेवाडी परिसरात राऊत यांच्या निवासस्थानी दुसऱ्या माळ्यावर बिबट्याने बस्तान मांडले होते. सुमारे तीन ते चार तास झुंज देत अखेर वनविभाग पोलीस आणि रेस्क्यू टीमने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आणि नंतर त्याला अधिवासात मुक्त केले होते.