

नागपूरः पुढच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक मैदानात उतरणार आहोत अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
स्थानिक स्वराज निवडणूक तोंडावर लोक मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहेत. आम्ही दीड कोटी सदस्य करणार आहोत. महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत . बीडच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकारच्या चौकशी लावल्या आहेत.100% आरोपीला कडक शासन होईल. वक्फ बोर्ड जमिनी संदर्भात बोलताना जो कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचे काय करायचे याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे. संयुक्त समिती लोकसभेची गठित झाली आहे. मला वाटते कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड केल्या आहेत. त्या परत मिळाल्याच पाहिजेत. नितेश राणे योग्यच बोलत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करत आहे. वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने गेलेली मालमत्ता परत मिळावी ही जनतेची इच्छा आहे.