

Kolkata Woman Threatened Nagpur
नागपूर : जिवानिशी मारण्याची धमकी देत कोलकात्यातील एका महिलेचे बळजबरीने धर्मांतरण केल्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी जिल्ह्यातील कन्हान पोलिसांनी जुनी कामठीतील गाडेघाट येथील हुजूर मरियम अम्मा दर्याच्या बाबासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोलकत्यातील पोलिसांनी दाखल केलेले हे प्रकरण कन्हान पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाची कागदपत्रे आम्हाला प्राप्त झाली आहेत. मात्र, महिलेचे एकंदर घटनाक्रम संदर्भात बयाण झालेले नाही. त्यामुळे याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे कन्हान पोलिसांनी सांगितले.
बावा ताजी चनवीरुद्दीन, त्याची पत्नी, ताजी स्तफाफीरुद्दीन फैज, तेजस ब्रागडे, बशरा फातेमा ताजी, मल्ला के व अन्य, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही पीडित महिला कोलकात्यातील डम भागात राहते. ती दर्शनासाठी जुनी कामठीत येते. एप्रिल महिन्यात ती अम्मा दर्गा येथे आली होती.
१८ एप्रिल रोजी रात्री काही जणांनी तिचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर महिलेचा विनयभंग करुन तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तिला डांबून ठेवले.
दुसऱ्या दिवशी कशीबशी स्वतःची सुटका करून घेत ती महिला रेल्वेने ती कोलकत्याला गेली. तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर तिने डमडम पोलिस ठाण्यात ताजी जनवीरुद्दीन आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात तक्रार दिली.