

Vidarbha Marathwada Stormy Rain Forecast
नागपूर : नवरात्र ,दसरा काळात पावसाने गरबा खेळला. यामुळे गरबा खेळणारे आणि आयोजकांची तारांबळ उडविली. आता दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. या तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.