उपराजधानीत अवैध डान्स बारवर छापा : १० तरुणी ताब्यात

Nagpur News | २१ जणांवर गुन्हे दाखल
Nagpur News
उपराजधानीत अवैध डान्स बारवर छापाFile Photo
Published on
Updated on

नागपूर : एकीकडे शासनाच्या दृष्टीने डान्सबारवर बंदी असली तरी शहरातील काही बारमध्ये अजूनही अवैधरित्या डान्ससुरू आहेत. एमआयडीसी रोडवरील एस बार अँड रेस्ट्रॉरेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात जवळपास ८ ते १० तरुणी या बारमध्ये अश्लील हातवारे करीत ग्राहकांसमोर नृत्य करत होत्या. ग्राहक पैशांची उधळण करताना सापडले. पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेत २१ जणांवर गुन्हे दाखल केले.

नागपुरात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वीच ही छम छमा छम उघडकीस आली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई-दिल्लीतून वारांगना नागपुरात दाखल होतात शिवाय दलालही सक्रिय असतात. एमआयडीसी रोडवरील एस बार अँड रेस्ट्रॉरेंटमध्ये गेल्या काही दिवसांपासून डान्सबार सुरु होता. जय बलदेव हिराणी (४२, पांडे ले-आऊट, खामला), राजू लालचंद झांबा (५९, महादेव हाईट्स,नारा, जरीपटका) आणि रोखपाल देवेंद्र रामकृष्ण शेंडे (३८, एकात्मतानगर, जयताळा) हे या बारचे मालक आहेत. त्यांनी बारमध्ये डान्ससाठी जवळपास १५ तरुणींना करारबद्ध केले. काही तरुणींना गीत गायनासाठी बोलवले होते. त्यांना पैशांचे आमिष दाखवत तोकडे कपडे घालून आंबटशौकीन ग्राहकांसमोर नृत्य करण्यास भाग पाडले जात होते.

छापा पडताच उडाली भंबेरी

या बारमध्ये डान्स सुरू असल्याचे कळताच एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी पथकासह रविवारी रात्री १.३० वाजताचे सुमारास बारमध्ये छापा घातला. यावेळी एकच खळबळ उडाली. या तरुणींमध्ये काही बाहेरील राज्यातील तर काही नागपूर शहरातील आहेत. कारवाईत पोलिसांनी बारमालक जय हिराणीसह व्यवस्थापक आणि रोखपालावरही गुन्हे दाखल करत त्यांच्यासह ग्राहक शिशूपाल देशमुख, निलेश उईके, गौरव फलके, गोपाल दडवी, विशाल नाईक, श्रीकांत नगराळे, आशिष प्रधान, गणेश चाचेर, दीपक जयस्वाल, प्रशांत वंजारी, अभिषेक इंगळे, जेम्स डेनी, रामसिंग ठाकूर, शेखर मोहिते, नितीन शिंदे, मिलींद वाडेकर, राहुल रामटेके आणि उमेश रोहित सापा यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news