

नागपूर : इतर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगणा रोड, नागपुर या वसतिगृहात मुलीचा विनयभंग व चोरी प्रकरणी सामाजिक व राजकीय वातावरण तापले आहे. अखेर चौकशीअंती संबंधित वसतिगृहाच्या गृहपाल व पहारेकरी यांना कंत्राटी सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.
यासोबतच अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी विभागाकडुन सर्व वसतिगृहाच्या सुरक्षितेबाबत आढावा घेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात येत असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, नागपूर प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी सांगितले.