भेदोडकर यांच्या 'त्या' साहसाची घेतली गृहमंत्रालयाने दखल !

Inspiring act : केंद्रीय गृहमंत्र्यालयाचे जीवन रक्षक पदक जाहीर
Bhedodkar's heroic action
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकरpudhari photo
Published on
Updated on

नागपूर : 'देव तारी त्याला कोण मारी ...'असे आपण नेहमीच म्हणतो पण त्यासाठी असाच एखादा देवदूत तुमच्या संकटकाळी धावून यावा लागतो. आपला जीव अनोळखी जागी धोक्यात घालून आई आणि मुलाचा वाहत्या पाण्यात जीव वाचविण्याचे धाडस दाखविणाऱ्या अशाच एका देवदूत पोलीस अधिकाऱ्याची थेट केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली आहे.

ज्ञानेश्वर भेदोडकर असे त्यांचे नाव असून सद्या ते स्थानिक हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. यापूर्वी गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला. -

...आणि सीताबर्डी परिसर काळोखात बुडाला, पाण्याने वेढला... !

नागपूर शहरात जोरदार पाऊस झाला अंबाझरीचे पाणी थेट सीताबर्डी परिसरात आले. पाणीच पाणी असे चित्र होते. त्यावेळी भेदोडकर त्यांच्या टीमसह रात्रपाळी गस्तीवर होते. वीज पुरवठाही बंद होता.पहाटे पाच वाजता हे पोलीस निरीक्षक रात्रग्रस्त संपून धंतोली मार्गे त्यांच्या घरी परत जात होते. शहरातील नाग नदी ही दुथडी भरून वाहत होती.

सुनीता तिवारी ही ४२ वर्षीय महिला जानकी टॉकीज धंतोलीच्या परिसरात तिच्या मुलासह अचानक रात्री आलेल्या पावसामुळे घरातच अडकली. अशावेळी शेवटचा उपाय म्हणून पोलीस नियंत्रण कक्षाला ती फोन द्वारे माहिती देते. पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे बिनतारी संदेशवर ही सूचना शहरात प्रसारित करण्यात येते. हा संदेश या पोलीस निरीक्षकाच्या कानी पडतो. वास्तविक ते त्यांचे कर्तव्य संपून घरी जात होते परंतु कर्तव्यतत्पर असल्याने माणुसकी त्यांना थांबवते. तातडीने ते पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतात.

दरम्यान, धंतोली पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील त्या ठिकाणी येतो परंतु पाण्यात उतरण्याची कुणाची हिंमत होत नाही, कारण पाण्याचा प्रवाह जास्तच वाढत चाललेला असतो. हा पोलीस निरीक्षक जीवाची कुठलीही पर्वा न करता तिच्या घरापर्यंत जातो. आतमध्ये जाण्यापूर्वी ते त्यांच्या पोलीस वाहनातील रस्सा दोरखंड सोबत घेतात. मुसळधार पाऊस व त्यातल्या त्यात अंधार आणि पाण्याची खोली किती आहे याचा कुणालाही अंदाज नसतो तरीदेखील ते त्या दोन्ही मायलेकाना बेल्ट व दोरीच्या साह्याने घराच्याच नव्हे ते मृत्युच्या दाढेतून बाहेर काढतात ! काळ आला पण वेळ आली नव्हती. एकप्रकारे ते पोलीस अधिकारी या मायलेकासाठी देवदूतच ठरले नाही का? त्यांच्या याच महान कार्याबद्दल त्यांना गणराज्यदिनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्र्यालयाचे जीवन रक्षक पदक जाहीर झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news