HIV Early Diagnosis | एचआयव्ही सारख्या आजारांचे लवकर निदान, एम्समध्ये नॅट केंद्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
HIV Early Diagnosis
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) नागपूर येथील न्युक्लिक ॲसिड टेस्टिंग (एनएटी) सेंटरचा शुभारंभ आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. याचवेळी गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उद्घाटन झाले. एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

एनएटी ही रक्त, लाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणी द्वारे एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी या सारख्या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात.

HIV Early Diagnosis
Nagpur News | आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसची जरीपटका पोलिसात तक्रार

अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो. गॅमा ब्लड इरॅडिएटरद्वारे शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार या उपकरणामुळे रोखले जातात.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. मृणाल पाठक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी, एम्स रक्त संक्रमण विभाग प्रमुख डॉ. सौम्या दास, डॉ. पराग फुलझेले, डॉ. रौनक दुबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news