गिरीश महाजन यांना का हवे, नाशिकचे पालकमंत्रीपद?

पालकमंत्रीपदाबाबत एकमताने हा निर्णय होईल; महाजन यांचे स्पष्टीकरण
Girish Mahajan statement
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन File Photo
Published on
Updated on

नागपूर : नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला महायुतीने स्थगिती दिली आहे. हा विषय लवकरच मार्गी लागेल असे सांगतानाच भविष्यात नाशिकमधील कुंभमेळा आणि आपला अनुभव लक्षात घेता आपल्याला पालकमंत्री व्हावेसे वाटते, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि.३१) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

महायुतीमधील तीनही पक्षांनी पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे. तीनही पक्ष तोलामोलाचे आहेत, म्हणून प्रत्येकाला वाटते. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा होता. त्यावेळी मी पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्रीही होतो. दादा भुसेंना मीच सांगितले होते. मध्यंतरी भुसेंना पालकमंत्री केले होते. आता दीड-दोन वर्षांनी पुन्हा कुंभमेळा होणार आहे. संगळ सुरळीत करायचं असेल तर तुम्ही पालकमंत्री व्हा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक येतील, असा अंदाज आहे. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आपण आयोजित केलेला होता. म्हणून मला असे वाटते की, याही वेळेला तशीच परिस्थिती राहिली तर आमचे काम अधिक सोयीचे होईल म्हणून आम्ही नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मागणी केली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तीनही नेते बोलत आहेत, चर्चा करत आहेत. एकमताने हा निर्णय होईल. मग तो रायगडचा असेल किंवा नाशिकचा असेल, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे कोणी मंत्रालयात येत नाही. घरी बसून कामकाज करतात. अडचणी आणि तक्रारी घेऊन राज्यभरातून लोक मंत्रालयात येतात. त्यामुळे किमान दोन दिवस तरी मंत्रालयात असायला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनेकजण महायुतीत यायला इच्छूक

सध्या राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची मोठी चर्चा सुरू आहे याबाबतीत बोलताना महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. येत्या काही दिवसातच याची सर्वांना प्रचिती येईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

ईव्हीएमचा प्रश्न निकाली

ईव्हीएमचा प्रश्न निकाली निघाला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना ईव्हीएममुळेच आपला पराभव झाल्याचे वाटत आहे. लोकसभेच्या वेळी ते ईव्हीएमबाबत काहीच बोलले नाहीत. विधानसभेचा निकाल विरोधात जाताच त्यांना घोटाळा दिसू लागला आहे. पराभव झाला म्हणून विरोधात बोलायचे म्हणून ते बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याबाबत जे काही बोलायचे आहे ते बोलतील. मात्र, ईव्हीएमचा विषय निकाली निघाला आहे, असे म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या शंका निरर्थक ठरविल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news