

नागपूर : वर्धा रोडवरील डोंगरगाव बस स्टॉपजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत क्राइम ब्रँचने बुधवारी (दि.२) मोठी कारवाई केली. हा अवैध जुगार गेमिंग पार्लरच्या आड सुरू करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून लाखोंचा मुद्देमाल जप्त करत चौघांना अटक केली.
शेख अखिल शेख बशीर, आसिफ शेख उर्फ सोनू हबीब शेख, मंगेश गजानन भाजीपाले आणि सचिन रमेश रगडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी ०७ इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन आणि रोख रकमेसह एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. यातील मुख्य आरोपी शेख अखिल शेख बशीर हा संपूर्ण जुगार रॅकेटचा प्रमुख संचालक होता. व आसिफ शेखला देखरेख आणि आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर सचिन रमेश रगडे गेमिंग मशीनवर सट्टा लावताना रंगेहाथ पकडला गेला. याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.