

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनसंघापासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू प्राध्यापक डॉ. योगानंद काळे यांचे आज (शनिवार) निधन झाले. डॉ. काळे हे धरमपेठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते.
उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निधनानिमित तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विदर्भातील शिक्षण, कृषी क्षेत्राबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. एक ज्येष्ठ सहकारी गेल्याने आपली कौटुंबिक हानी झाली. विदर्भाचे सामाजिक, शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली आहे.