

नागपूर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी सोमवारी नागपुरात अटक केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात जाधव हे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने जाधव यांनी वारंवार बोलावूनही येणे टाळत न्यायालयाच्या अवमानप्रकरणी अटक करून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. मात्र, लगेच छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपचारानंतर त्यांना ताब्यात घेणार असल्याची व कारागृहात रवानगी केली जाणार आहे.