धंतोलीत भीषण आग,चार झोपड्या जळून खाक

महापौर निता ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी घेतली भेट
nagpur news
धंतोलीत भीषण आग,चार झोपड्या जळून खाकfile photo
Published on
Updated on

Fierce fire in Dhantoli, four huts burnt down

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

धंतोली यशवंत स्टेडियम परिसरात उदासी आश्रम जवळील चार झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटणेत चारजण जखमी झाले. सोमवारी सकाळी ही आग लागली.

nagpur news
Beed Crime News | धारूर येथील एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. नागपूर महानगरपालिका व राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व जख्मींची विचारपूस केली.

यावेळी नगरसेवक विनय दाणी, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक, नगरसेविका श्रीमती धनश्री देशपांडे, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम उपस्थित होते.

nagpur news
Beed Crime News | धारूर येथील एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

आगग्रस्त घरातील श्रीमती बसंती ठाकूर, योगेश ठाकूर, राजेंद्र सिंग सड्डल व सुरेश ठाकूर यांच्या कुटुंबातील सदस्यांची महापौरांनी भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news