Nagpur| शेतकऱ्यांचे नुकसान, कृषीमंत्री असंवेदनशील : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar criticism: पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची मागणी
Vijay Wadettiwar on agriculture minister
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार File Photo
Published on
Updated on

नागपूर : विदर्भ,मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे. बहुमत मिळाल्याने कोणीही आमचे वाकडे करू शकणार नाही, असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे,महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही. पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैसे अँडव्हान्स भरले नाही म्हणून मृत्यू झाल्याप्रकरणी सरकारने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी म्हणजे पळवाट असल्याची टीका केली. या रुग्णालयाला एक रुपयात जमीन ही रुग्णसेवीसाठी दिली. मात्र सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या बायकोचा मृत्यू होतो, याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

दहा लाख रुपयाची पावती हा ठोस पुरावा असताना आता चौकशी लावणे हे सरकारचे ढोंग आहे. शेवटी कुणाला वाचवण्यासाठी सरकारने ही समिती नेमली ? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.मंगेशकर रुग्णालयात जर रुग्णांना योग्य सेवा मिळत नसेल तर त्यांना दिलेली जमीन रद्द करा. मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय रुग्णांना इतकी वाईट वागणूक मिळूच शकत नाही, त्यामुळे या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाईची करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news