Nagpur Farmer Death | पाऊस लांबल्याने पिके जगविण्याची विवंचना; शेतकऱ्याने जीवन संपविले

केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिलेपार भागातील घटनेने हळहळ
  Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Farmer Life Ended Nagpur

नागपूर : शेतात विष प्राशन करून शेतकऱ्याने जीवन संपविले. ही घटना केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिलेपार भागात घडली. खुशाल बळीराम जोगी (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी खुशाल हे शेतात गेले. तेथे त्यांनी विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

  Crime News
Nagpur Playgrounds | नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध खेळांच्या मैदानांचा सर्वांगीण विकास केला जाणार

खुशाल यांनी १४ एकर शेती एक वर्षासाठी बटईने घेतली. शेतात पेरणी केली होती. मात्र पाऊस लांबल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ते चिंतेत होते. आर्थिक अडचणीमुळे ते तणावात राहायचे. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news