नागपूर : रामटेक तालुक्यातील पवनी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तुयापार बिट परिसरात वाघाने केलेल्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुखराम गुंटू सर्यम (वय.५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुखराम हे तुयापार येथील भात आणि कपाशीच्या शेतात जंगली पहारा देण्यासाठी शेतातून त्यांच्या शेताकडे जात होते. यावेळी डाव धरुन बसलेल्या वाघाने सुकराम यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वाघाने सुखरामच्या शरीराचे तीन तुकडे केले. तपासाअंती वाघाने मृतदेह ओढत जवळच्या जंगलात नेल्याचे लोकांना दिसले. बुधवारी (दि.16) ही घटना सकाळी उघडकीस येताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांची गर्दी घटनास्थळी जमली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाच्या वाहनाची संतप्त ग्रामस्थांकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. कुटुंबीयांना आर्थिक मोबदला, नोकरीची मागणी करण्यात आली.