सर्वजण मिळून मुख्यमंत्री ठरवणार : विजय वडेट्टीवार

मविआच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वडेट्टीवारांचे विधान
Vijay Wadettiwar
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार pudhari photo
Published on
Updated on

नागपूर - महाविकासआघाडीमध्ये 50 ते 55 जागांचा प्रश्न शिल्लक आहे. 14 ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय होईल. मुख्यंत्रीपदाबत सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. कोणी म्हणणार नाही, मी होणार, तो होणार महायुतीला सत्तेतून खाली उतरवायचे असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यासोबतच मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना तसेच काँग्रेस नेत्यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. अनेक विभागांमध्ये सचिव नाहीत.कृषी विभागात सचिव नाही. मर्जीतले सचिव बसून तिजोरी लुटत आहेत. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, काही जागांवर आम्ही दोन, तीन चार वेळेला पराभूत झालो असलो तरी त्या ठिकाणी शरद पवार गटाची किती ताकद आहे हे पहावे लागेल. आम्ही तिथे हरलो म्हणून जागा सोडावी असे होत नाही. मेरीट प्रमाणेच निर्णय होईल.. जिथे काँग्रेसची ताकत आहे, तिथे काँग्रेसने लढावे असे आमचे मत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. जेव्हा आम्ही हरलो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती याकडे लक्ष वेधले.

Vijay Wadettiwar
विजय वड्डेटीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण जाहीर केल्याशिवाय निवडणुका नाहीत

क्रिमिलियरची मर्यादा 15 लाख करणे ही शुद्ध धूळफेक आहे. हे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेले काम आहे. आतापर्यंत निर्णय का झाला नाही.. ओबीसींची मते मिळवण्यासाठी हे निर्णय आहेत आणि ही फक्त राज्य सरकारची शिफारश आहे, केंद्र सरकार काय निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून राहील. संघ,भाजपचे धोरण ओबीसीला वापरा, हिंदुत्वाचा एजेंडा वापरा,ओबीसींना वापरून त्यांच्या डोक्यावर हिंदुत्वाचा एजेंडा लादून, या देशात तीन टक्के लोकांनी राज्य करायचे हे आजवर सिद्ध झाले आहे. त्यांना सत्ता मिळवण्यासाठी ओबीसी हवय सत्तेच्या खुर्चीसाठी ओबीसी नको आहे. आता लवकरच अनेक लोक पंजा आणि तुतारी हाती घेतील. हरयाणामुळे हुरळून जाऊ नका, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मोदी- शहा येऊनही लोकसभेत काय झालं हे सर्वांना माहीत आहे असा सबुरीचा सल्ला भाजपला दिला.कोरपनाच्या घटनेनंतर आमच्याही घरावर मोर्चे काढले यांना लाज नाही.राज्यात मुली आणि महिला सुरक्षित कुठे आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news