

नागपूर - नागपुरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा 30 वर्षांचा कॉम्प्रेन्सिव्ह प्लॅन लवकरच जनतेसाठी खुला केला जाईल. यासंदर्भात जनतेकडून सूचना घेतल्या जातील. हा प्लान मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी तीन टप्प्यांमध्ये करण्यासाठी निधी नियोजन केले जाईल. पहिला टप्पा पुढील पाच वर्षात राबवला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी विविध बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
नागपूर जिल्ह्याचा पुढील 30 वर्षाचा "कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन" सर्व लोकप्रतिनिधी समोर ठेवण्यात आला. राइट्स या संस्थेला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यास सांगितला होता. विद्यमान नागपूर शहर, जिल्हा ग्रुप सेंटर भविष्यात निर्माण होऊ शकेल असे ग्रोथ सेंटर लक्षात घेऊन त्या ठिकाणी आवश्यक मोबिलिटी प्लॅन तयार करण्यास सांगितले होते. आताच्या मोबिलिटी प्लानमध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करणे, रस्ते मोठे करणे नवीन रस्ते निर्माण करणे, अंडरपास किंवा बायपास तयार करणे उड्डाणपूल तयार करणे, बसची व्यवस्था करणे, ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था पाहणे, फुटपाथची व्यवस्था हे सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्री म्हणाले,मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या पद्धतीने मेट्रोचा वापर सुरू केला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मेट्रो ज्या भागापर्यंत जाणार आहे. त्यामुळे नागपूरची प्रवासी संख्या दुप्पट होणार आहे. कारण नागपूरच्या उपनगरी भागापर्यंत दुसऱ्या टप्प्यात मेट्रो पोहोचणार आहे.