५ महिने व्हेंटिलेटरवर तरी चार वर्षाचा बालक ठणठणीत !

साडेपाच महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या या बालकाला ठणठणीत असल्याने नुकतीच सुटी दिली गेली.
nagpur news
५ महिने व्हेंटिलेटरवर तरी चार वर्षाचा बालक ठणठणीत ! file photo
Published on
Updated on

Despite 5 Months on a Ventilator, a Four-Year-Old Child Makes a Full Recovery!

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

देव तारी त्याला कोण मारी... म्हणतात ते खोटे नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ३ वर्षे ११ महिन्यांचे बालक कार्तिक चव्हाण याला नोव्हेंबर महिन्यात गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे श्वसन निकामी झालेल्या अतिगंभीर अवस्थेत लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे दाखल करण्यात आले.

nagpur news
Yavatmal News | सिकलसेल रुग्णांची उपचारविना  हेळसांड; जिल्हा प्रशासानाकडे तक्रार

साडेपाच महिने व्हेंटिलेटरवर असलेल्या या बालकाला ठणठणीत असल्याने नुकतीच सुटी दिली गेली. अतिदक्षता विभागामध्ये अतिगंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले तेव्हा तात्काळ व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता होती. २४ तासांच्या आत त्याची आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणी करण्यात आली. अतिशय महागडे इंट्रावेनस इम्यूनोग्लोब्युलिन (IVIG) औषध देखील पूर्णपणे मोफत देण्यात आले.

या रुग्णावर बालरोग विभागातील तज्ज्ञांची टीम डॉ. गिरीश नानोटी व डॉ. हिमांशू दुवा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. बालकाला सुमारे पाच महिने दीर्घकाळ व्हेंटिलेटर सपोर्टची गरज भासली. दीर्घकालीन श्वसन सहाय्यासाठी ट्रॅकिओस्टॉमी करण्यात आली. संपूर्ण उपचार, औषधे व रुग्णालयीन सेवा मोफत पुरविण्यात आल्या. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून नियमित फॉलो-अपमध्ये आहे.

nagpur news
Trauma Care Unit : आणखी किती बळी गेल्यास सुरु होणार ट्रॉमा केअर युनिट ?

आमदार डॉ. आशिष देशमुख (उपाध्यक्ष, व्हीएसपीएमएएचई), डीन डॉ. सजल मित्रा, व्हाइस डीन व मेडिकल सुपरिंटेंडंट डॉ. नितीन देवस्थळे, तसेच चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. अनुज तिवारी यांनी बालरोग विभागाच्या या टीमचे अभिनंदन केले.

जीबीएस हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल विकार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय नसांवर आघात करते. सुरुवातीला पायांमध्ये अशक्तपणा किंवा झिणझिण्या जाणवतात व पुढे पक्षाघात होऊ शकतो. गंभीर अवस्थेत श्वसनावर परिणाम होऊन व्हेंटिलेटरची गरज भासू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news