Nagpur News
स्वातंत्रदिनी डान्स करताना पोलिस अधिकारीPudhari Photo

नागपूर : स्वातंत्रदिनी डान्स करणे पोलिसांना भोवले; चार पोलिस निलंबित

दोन महिला शिपाई आणि दोन पुरुष पोलिस निलंबित
Published on

नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यानंतर जल्लोषात, रंगारंग कार्यक्रमात ' खई के पान बनारस वाला...' या गीतावर बेधुंद डान्स करणाऱ्या दोन महिला पोलिस शिपायांसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.21) तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मागील काही दिवस सोशल मीडियावर या डान्सची चर्चा रंगली होती. पोलिलांना सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या काळात त्यांना अर्धा पगार मिळणार असून ओळखपत्र, पोलिस वर्दी जमा करावी लागणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या नजरेत देश, कायदा रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच असे गैरवर्तन करणे चुकीचे असल्याचा ठपका त्यांच्या निलंबन आदेशात लावण्यात आला आहे.

Nagpur News
जयसिंगपूरचे तीन पोलिस कर्मचारी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित

सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटणकर, हेड कॉन्स्टेबल अब्दुल कय्युम गनी,महिला पोलीस शिपाई भाग्यश्री गिरी, निर्मला गवळी अशी या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमानंतर तहसील पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला हा व्हिडिओ वरिष्ठापर्यंत पोहोचला. सोशल मीडियामध्ये तो चांगलाच शेअर झाल्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी तातडीने दखल घेत निलंबनाचे आदेश दिले. झोन 3 उपायुक्त राहुल मदने यांनी हे आदेश काढले असून या चारही निलंबित कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात रोज हजेरी लावावी लागणार आहे. पोलीस यंत्रणा ही शिस्तप्रिय संस्था असून त्यांनी आपल्या गणवेशात त्याचा अनादर केला. लोकांच्या नजरेत पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केली असा ठपका त्यांच्या लावण्यात आला आहे. सामाजिक पातळीवर या घटनेची, निलंबन आदेशाची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news