

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे क्रिकेट अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन झाल्याचा एकिकडे जल्लोष सुरू होता. यावेळी उत्सवा दरम्यान फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच नागपुरातील पाच पावली परिसरातील बारसे नगरात एका घरी सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये एक महिला जखमी झाल्याची घटना (रविवार) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
एका पाठोपाठ दोन, तीन सिलिंडर ब्लास्ट झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांनी दिली. जोरदार आवाज आणि घराला आग लागली. एका गंभीर जखमी महिलेस तातडीने मेयो इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लीलाबाई गोखले (वय 45 वर्षे) असे या जखमी महिलेचे नाव आहे.
अग्निशमन विभागाच्या तीन-चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शनिवारी रात्री मेयोत आगीची घटना घडली. या आगीत कचरा, कागदपत्रे जळून खाक झाले. फारसे नुकसान झाले नसले तरी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत धाव घेतल्याने सतर्कतेमुळे या परिसरातील रक्तपेढी, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचे होणारे मोठे संभाव्य नुकसान टळल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.