नागपूरात काँग्रेसचे मतदार दिनी आंदोलन

Nagpur News | ईव्हीएम, निवडणूक आयोगावर घेतला आक्षेप
EVM machine
ईव्हीएम मशीन
Published on
Updated on

नागपूर - नागपुरात संविधान चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मतदाता दिवसानिमित्त शहर काँग्रेसतर्फे शनिवारी आंदोलन करण्यात आले. आज राज्यभरात याप्रकारे आंदोलन झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुरात तर माझी विरोधी पक्षांचे विजय वडेट्टीवार यवतमाळ येथील आंदोलनात सहभागी झाले. प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार तथा काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत- निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका आणि ईव्हीएमच्या मुद्यावर काँग्रेसने आरोप केले. ईव्हीएम विरोधात फलक हाती होते. जोरदार घोषणा देत मतदारांमध्ये जागृतीचा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयोग बुथनिहाय मतदान आकडेवारी, वाढीव मतदार याबाबत माहिती देत नसल्याने लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले.

निदर्शने आणि घोषणाबाजीं केल्यानंतर शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि ब्लॉक अध्यक्ष यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश पांडव,अतुल कोटेचा ,प्रशांत धवड व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news