

Vijay Wadettiwar on GST issue
नागपूर: जीएसटी कमी करता येत होता, तर तो गेली आठ वर्ष का कमी केला नाही? याचे उत्तर केंद्र सरकार देणार आहे का? जनतेकडून ज्यादा टॅक्स वसूल का केला? याचे उत्तर आधी द्यावे, मग सरकारने श्रेय घ्यावे, असा सवाल काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
हे सरकार जेव्हा लोकांवर अन्यायकारक जीएसटी लादत होते. तेव्हा काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला आणि विरोध केला. जीएसटी कर कमी करावा, त्यावर कॅप लावावी, अशी मागणी राहुल गांधी गेले आठ वर्ष सातत्याने करत होते. परंतु, निवडणुकीत फटका बसेल या भीतीने केंद्र सरकारने जीएसटी आज कमी करून त्याचे श्रेय घेण्याचे काम सुरू केले आहे?
गेली आठ वर्ष लोकांना लुटले त्याची जबाबदारी सरकार घेणार का? जर जीएसटी कमी करता येत होता तर तो गेली आठ वर्ष का कमी केला नाही, याचे उत्तर सरकार देणार का? जनतेकडून ज्यादा टॅक्स वसूल का केला याचे उत्तर आधी द्यावे मग सरकारने श्रेय घ्यावे. लोकांना लुटले आणि आज दिवाळी साजरी करत आहेत असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.