CM Devendra Fadnavis | मी मुंबईत आणि महाराष्ट्रातचं, मुख्यमंत्र्यांनी चर्चेतील हवाच काढली!

कोणाला आनंद सेलिब्रेशन करण्याची संधी मिळत आहे त्‍यांनी घ्यावी - विरोधकांना टोमणा
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis
Published on
Updated on

नागपूर - आपण कुठेही दिल्लीत जाणार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. या साऱ्या वल्गना आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या ठरविल्या. मी आता कार्यक्रमांसाठी नागपुरात आहे. सायंकाळी मुंबईत आहे आणि मुंबईतच राहणार, महाराष्ट्रातच राहणार असे एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

आता या सर्व प्रकारानंतर कुणाला आनंद,सेलिब्रेशन साजरे करण्याची संधी मिळत आहे तर ती घेऊ द्यावी असा टोमणा विरोधकांना लगावला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशातील तरुणाईच्या भविष्यासाठी गंभीर आहेत. त्यांच्या एका मध्यरात्री टाकलेल्या व्हिडीओला जे फॉलोअर्स मिळतात त्यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते. बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे उद्याच मुलांच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचे विधेयक येत आहे. कधी नव्हे ते महत्वाचे कठोर निर्णय मुलांच्या भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. आम्हाला देखील याचा आनंदच आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गेले दोन दिवस माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून फडणवीस दिल्लीला शिक्षणमंत्री म्हणून जाणार अशी चर्चा जोरात आहे. राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे यावरही फडणवीस - शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर चर्चा रंगली. मात्र आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी या चर्चेतील हवा काढून टाकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news