नागपुरातील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

नव्या प्रशासकीय इमारतींच्या कामांचा घेतला आढावा
Nagpur News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची पाहणी केली.
Published on
Updated on

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.३१) नागपूर येथे एम.एस.आय.डी.सी.च्या वतीने दाभा येथे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र (एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर) आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली. या अनौपचारिक निरीक्षण दौऱ्यात एम.एस.आय.डी.सी.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली. दोन्ही प्रकल्पांच्या तांत्रिक बाबींचे सादरीकरण व्हिडिओ फिल्मच्या माध्यमातून करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी कामाच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले आणि आवश्यक सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दाभा येथे भव्य आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत नागपूरच्या कृषी महाविद्यालयात ५९,३६० चौ. मी. क्षेत्रफळावर हे केंद्र उभारले जात आहे. अत्याधुनिक आणि आकर्षक वास्तुशैली असलेल्या या केंद्रामध्ये कृषी प्रदर्शन, परिषद व संशोधन यासाठी अद्ययावत सुविधा असणार आहेत.

नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारल्या जात असलेल्या नवीन प्रशासकीय १२ मजली इमारतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर संबंधित शासकीय कार्यालये असतील. विशेष म्हणजे, ही नवीन इमारत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला संलग्न राहणार आहे. तसेच या इमारतीची आर्कषक आणि आधुनिक रचनाशैली विशेष आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर नागपूर शहराला कृषी आणि प्रशासन क्षेत्रात नव्या उंचीवर नेणाऱ्या अत्याधुनिक सुविधा मिळणार असल्याचे एम.एस.आय.डी.सी. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news