Chemist Strike : औषध विक्रेत्यांचा एल्गार! देशभरातील औषध दुकाने '२० मे' ला बंद राहणार

ऑनलाईन फार्मसी आणि कॉर्पोरेट स्पर्धेचा तीव्र निषेध
Chemist Strike
Chemist Strike
Published on
Updated on

नागपूर : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक स्पर्धेमुळे देशातील पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) येत्या २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये देशभरातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीबाबत नोटिफिकेशन जारी केले असले, तरी अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने या विक्रीला स्थगिती दिली असतानाही, देशात सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू आहे. या बेकायदेशीर व्यवसायामुळे ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच यामुळे देशातील १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात येऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकारने Drug Price Control Order (DPCO) 2013 अंतर्गत १६% एवढा नियंत्रितं केलेला नफा याबाबतची तरतूद मागे घ्यावी तसेच औषध विक्रेत्यास डॉक्टरने लिहिलेल्या औषधासारखी अनेक पर्यायी औषधी देण्याचा अधिकार दिल्यास औषध विक्रेतेही स्पर्धेला उत्तर देऊन सक्षमपणे कार्पोरेट कंपन्यासोबत लढा देऊ शकतील, असे एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जनतेस होणाऱ्या त्रासाला सरकार जबाबदार राहील, असे डिस्ट्रिक्ट केमिस्ट्स अण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे व सचिव संजय खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news