

Nagpur Congress
नागपूर ; एकीकडे भाजप 51 टक्के मतांसह नागपुरात महायुतीची सत्ता, महापौर आमचा असा दावा करीत असताना आज मुंबईत बैठकीत या निवडणुकीत नागपुरात बदल निश्चित असा काँग्रेसचा दावा पुढे आला आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने उद्या 17 डिसेंबरला नागपुरात बैठक बोलावली आहे. मुंबई येथे नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी राज्य विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि नागपूरसाठी काँग्रेसचे निरीक्षक असलेले माजी मंत्री रणजीत कांबळे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बैठक झाली.
मित्र पक्षांसोबत भक्कम आघाडी करीत निवडणूक रणनीती आणि सक्षम उमेदवारांची निवड या महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सखोल व सकारात्मक चर्चा झाली असून सातत्याने असलेली भाजपची सत्ता आणि वाढलेला भ्रष्टाचार याला नागपूरची जनता कंटाळली असून यावेळी मतदार परिवर्तन घडवतील असा विश्वास शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी बोलून दाखविला.