भाजप कोअर कमिटीची आज बैठक; कुणाला मिळणार संधी?

विधानसभा निवडणुकीबाबत खलबत, नावे होणार जाहीर!
bjp-core-committee-meeting-
चंद्रशेखर बावनकुळेfile photo
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी ५ जागांवर राज्यात भाजप कुणाकुणाचे पुनर्वसन करणार, याकडे इच्छुकांसोबतच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव यांच्यासह मुंबईत २१ लोकांची कोअर कमिटीची आज बैठक होत असून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा आणि १४ जुलै रोजी पुण्यात विस्तारित कार्यकारिणीची बैठक यावरही प्राधान्याने चर्चा होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यावेळी येण्याची शक्यता आहे.

bjp-core-committee-meeting-
मुंबई दरडमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज भाजप केंद्रीय पार्लमेंट्री बोर्डकडून निश्चितच नावे जाहीर होतील आणि ती नक्कीच कर्तृत्ववान, राज्याच्या विकासासाठी चांगली, सर्वसमावेशक असतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, भाजपतर्फे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. पूर्व विदर्भातील माजी मंत्री परिणय फुके तसेच नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे या दोघांची नावे यासाठी चर्चेत असली तरी यापैकी एकालाच संधी दिली जाईल, असेही बोलले जाते. '

ते' पत्र खोडसाळपणा

दुसरीकडे बावनकुळे यांच्या लेटर हेडवर सामाजिक समीकरणासह विधानपरिषद सदस्यांची जी नावे दिल्लीला पाठविली त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. मात्र ते पत्र नव्हे तर कुठे प्रोटोकॉल नाही, कुणीतरी खोडसाळपणा केला असल्याचे व तपास करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. शिवसेना शिंदे गटातर्फे नेमकी कुणाला संधी दिली जाणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेकजण इच्छुक आहेत. माजी आमदार राजू जैन, सुलभा खोडके, आभा पांडे अशी नावे चर्चेत असून नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर, शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी देखील आमच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेत केली. या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीत विधान परिषदेची लॉटरी कुणाकुणाला लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news