Maharashtra Day 2025 | 'महाराष्ट्रातील मजबूत पोलीस प्रशासन एकेका पाकिस्तानी व्यक्तीला शोधून काढेल'- चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule - महाराष्ट्र दिन सोहळा | 'महाराष्ट्रातील मजबूत पोलीस प्रशासन एकेका पाकिस्तानी व्यक्तीला शोधून काढेल'
Chandrashekhar Bawankule at nagpur Maharashtra Day 2025
महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात राष्ट्रध्वजास वंदन केलेx account
Published on
Updated on

Maharashtra Day 2025 Chandrashekhar Bawankule at Nagpur

नागपूर -

महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभ पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील ६ लोकांचे पहेलगाममध्ये जीव गेले, यामुळे १४० कोटी जनतेला वेदना झाली आहे, असे दु:ख व्यक्त केले. ते भाषणात म्हणाले, ''तो दिवस कश्मीर आणि पर्यटन क्षेत्राला अत्यंत वाईट दिवस होता. महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा ३ कोटी लोकसंख्या होती, आज १४ कोटी आहे. आमच्या महाराष्ट्रातील मजबूत पोलीस प्रशासन एकेका पाकिस्तानी व्यक्तीला शोधून काढतील आणि केंद्राने ठरवले, त्याप्रमाणे कारवाई होईल. महाराष्ट्र सांभाळत पुढे नेण्याची जवाबदारी आपली आहे. अनेक महापुरुषांनी राज्याला आदर्श घालून दिले, त्यांच्या आदर्शवर राज्य प्रगती करतोय.''

अनेक कायद्यात आता बदल केला जातोय, कामगार कायदे बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यामुळे कामगारांच्या आयुष्यत चांगले दिवस येतील. मोदींनी देशात १९४८ नंतर जातीय जनगणनेचा निर्णय घेतला. जातीय जनगणना करून जे आर्थिक दुर्बल आहे, त्यांना मदत होईल, प्रत्येक व्यक्तीच्या जातीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. १८ पगड जाती, १२ बलुतेदार यांच्यातील अनेक लोकांना सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न करत आहे. २०४७ पर्यंत नव्या शैक्षणिक नितीनुसार जगाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा निर्णय तयार होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात आधी १०० दिवसात काय सुधारणा होऊ शकतात, याचा कार्यक्रम सर्व मंत्र्यांना दिला आहे. माझ्या महसूल खात्यात २४ सुधारणा करण्यास सांगितले, जे अनेक वर्षे प्रलंबित होते. पाकिस्तानला देशात थारा राहणार नाही. पाकिस्तानमधील नागरिकांना बाहेर पाठविले जाणार आहे. सिंधू करार रोखून कणखर निर्णय मोदींनी घेतला आहे. जम्मू-काश्मीरमधील २००० संशयितांना ताब्यात घेतले. नागपूर पोलीस आयुक्तांना विनंती आहे की, नागपूरमध्ये अनेक एन्फ्लुयन्सर छोट्या-छोट्या क्लिप तयार करून सामाजिक वातावरण खराब करत आहे. काही लोक संभ्रम निर्माण करतात.

आम्ही दिलेला वचननामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. लाडकी बहीण, महिलांना मोफत शिक्षण, सारख्या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. प्रशासन गृह, आणि महसूल खात्याने चालविले तर चांगले निर्णय घेता येतात. मुलांच्या शिक्षणासाठी कुठल्याही स्टॅम्प पेपरची गरज पडणार नाही. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन योजना आणत आहे. ज्यात राज्यात कुठेही बसून कुठलंही रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मंत्रालयातील सचिव ते तहसीलदार जे प्रमोशनला प्राप्त आहेत त्यांना लवकरच प्रमोशन मिळणार.

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविणार. विद्यार्थ्यांना शाळेतच सगळ्या सुविधा मिळणार. त्यांना तहसीलच्या ठिकाणी जावं लागणार नाही.

Chandrashekhar Bawankule at nagpur Maharashtra Day 2025
Maharashtra Day | 'महाराष्ट्र प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ!' PM मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

सिंधी समाजाला पट्टे वाटप योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केली, ५ ब्रास रेतीची रॉयल्टी आता नागरिकांच्या घरी थेट नेऊन देण्याची योजना आणली आहे. प्रशासन म्हणून काही चुका आमच्याकडून होऊ शकतात, जे काम करतात त्यांच्याकडूनच चुका होऊ शकतात.

बावनकुळे म्हणाले, आज कामगार दिन आहे. कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छ. कामगार दिनानिमित्त आमच्या सरकारने जे नवनवीन कायदे आणून कामगारांच्या जीवनाला स्थैर्यता दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मोदीजींचा सरकार आणि फडणवीस यांचा सरकार हे डबल इंजिन सरकार आहे. लोकांच्या जीवांचे मालमत्तेचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, ज्या काही शासनाच्या योजना आहेत, त्या व्यवस्थित पार पाडण्याकरिता महाराष्ट्राची सेवा करू.

आम्ही मतांचे कर्ज घेतलेले आहे. पाच वर्षात दिलेला शब्द आम्ही पाळू

राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत खोटारडेपणा केला. १९४८ पासून कधीही जातीय जनगणनेचा विचार केला नाही. ओबीसी समाजाची, ओपन कॅटेगिरीची जनगणना का केली नाही, समाजात एक करोडपती आहे तर एक कमजोर आहे. समाजातील कमजोर व्यक्ती शोधणे. सामाजिक समता निर्माण करण्याचा काम पंतप्रधान मोदींनी केलंय. सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, असा हा ऐतिहासिक दिवस आहे.

मी दुसऱ्या पक्षाचा नेता असतो तर स्वतः अभिनंदन केलं असतं. मोदीजींनी जातीय जणगणनेचे निर्णय घेऊन न्याय दिलेला आहे. आमच्या ग्रामसभा मोदींचे अभिनंदन करतील. महाराष्ट्रातील १ लाख १८० बुथवर भाजपच्या कमिट्या आहेत. त्या सर्व कमिट्या मोदीजींच्या अभिनंदनचा ठराव पारीत करतील, जातीय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल बाराशे मंडळ त्या ठिकाणी आम्ही अभिनंदन ठराव पारीत करू.

Chandrashekhar Bawankule at nagpur Maharashtra Day 2025
Maharashtra Day 2025 | हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण; फडणवीसांचे महाराष्ट्र दिनी अभिवादन

मराठा जात नोंदीवर ते म्हणाले, जेव्हा जातीगणना होईल, त्याची नोंद होईल आणि राज्यातील अस्थिर वातावरण आहे ते संपेल आणि स्थिरता निर्माण होईल.

जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मोदींनी दिलाय. मराठी भाषेचा सन्मान मोदींनी केला. या महाराष्ट्राला मजबुती मोदींनी दिली. खुर्ची नाहीये, त्यामुळे जयंत पाटलांना वाटत असेल. गेली पाच वर्षे त्यांनी राज्य केलं. त्यावेळी काही का नाही केल. हे आता राजकारण सुरू झालेलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news