चंद्रपूर : ताडोबा पर्यटनाच्या ऑनलाईन बुकींगला अखेर मुहूर्त मिळाला!

चंद्रपूर : ताडोबा पर्यटनाच्या ऑनलाईन बुकींगला अखेर मुहूर्त मिळाला!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन सफारीची एका खासगी कंपनीची ऑनलाईन बुकींगची सेवा संपुष्ठात आणल्यानंतर अखेर ताडोबाच्या  शासकीय एनआयसीच्या पोर्टलद्वारे बुकींग करण्याचा मुहूर्त मिळाला आहे. शनिवार 23 सप्टेंबर पासून कोअर आणि बफर झोनमध्ये पर्यटकांना ऑनलाईन बुकींग करता येणार असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

2021 ते 2023 कालावधीतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारीचे ऑनलाईन बुकींगचे कंत्राट अभिषेक विनोदकुमार ठाकुर, रोहीत विनोदकुमार ठाकुर रा. चंद्रपूर यांच्या मालकीच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीला मिळाले होते. ताडोबा प्रशासन व कंपनीमध्ये झालेल्या करारानंतर ताडोबा कोअर झोन व बफर झोनमधील पर्यटक सफारीची ऑनलाईन बुकींग करीत होती. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा चंद्रपूर (टी.ए.टी.आर.) कंपनीने सन 2020-21 ते 2023-24 या वर्षात केलेल्या लेखापरीक्षणात 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपये अफरातफर केल्याचे उघड झाले. विभागीय वनाधिकारी सचीन शिन्दे यांनी, रामनगर पोलिस ठाण्यात सदर कंपनीच्या विरोधता तक्रार दाखल केल्यानंतर चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचे आरोपी अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर यांचे विरोधात कलम 420, 406 भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुमारे बारा कोटींची अफरातफर केल्यानंतर ताडोबा प्रशासनाने चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीचा कंत्राट संपुष्ठात आणले. त्यामुळे कंपनीने न्यायालयात धाव घेतली. प्रकरण न्यायालयात असल्याने ऑनऑईन बुकींग तात्पुरती थांबविण्यात आली होती. तेव्हापासूनच ताडोबाची बफर व कोअर झोनमधील पर्यटन सफारीची ऑनलाईन बुकींग बंद आहे. फक्त बफरझोनमध्येच पर्यटन सफारी ऑफलाईन बुकींगद्वारे सुरू आहे. तर कोअर झोनधील पर्यटन सुफारी दरवर्षी प्रमाणे 30 सप्टेंबर पर्यंत बंद आहे. परंतु 1ऑक्टोबर पासून ही कोअर झोनची सफारी सुरू होते. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ताडोबाकडे पर्यटक येतात. जिल्हा व सत्र न्यायालयाने यावर तोडगा काढीत ताडोबा व्यवस्थापनाने स्वत:च्या पोर्टलद्वारे ऑनलाईन बुकींग करण्याचा‍ निर्णय दिल्याने ताडोबाला स्वत:च्या पोर्टलद्वारे पर्यटन सफारची ऑनलाईन बुकींग करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन कंपनीने ऑनलाईन बुकींग मध्ये सुमारे बारा कोटींची अफरातफर केल्यानंतर ताडोबा प्रशासनाने त्यांचा कंत्राट रद्द करून स्वत: एनआयसीची ऑनलाईन बुकींगसाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. एनआयसीच्या पोर्टलद्वारे पर्यटन सफारी ऑनलाईन बुकींग करण्याला मुहूर्त मिळाला आहे.

1 ऑक्टोबर पासून कोअरझोनमध्ये पर्यटन सुरू होणार आहे. तत्पूर्वीच शनिवारी (23 सप्टेंबर 2023) शासकीय पोर्टलद्वारे ऑनलाईन बुकींग सुरू करण्याचा निर्णय घेतलाआहे.  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे कोर व

बफर क्षेत्रात जंगल सफारीसाठी बुकिंग www.mytadoba.mahaforest.gov.in या वेबसाईटद्वारे करता येणार आहे. ही बुकिंग प्रणाली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी एनआयसी (National Informatics Centre) यांच्या माध्यमातून विकसित केली आहे. कोअर क्षेत्रात पर्यटनासाठी उपलब्ध कँटर वाहनाची बुकिंग वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालय कार्यालयात २५ सप्टेंबर २०२३ पासून सकाळी ११ ते २ व दुपारी ३ ते ५ या वेळेस सुरु राहणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news