चंद्रपूर काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा तिढा सुटला! वडेट्टीवार गटाची याचिका मागे...!

काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून घेतलेल्या निर्णयामुळे अंतर्गत तिढा सुटल्याने ती याचिका मागे
Chandrapur Congress news
Chandrapur Congress news
Published on
Updated on

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: अखेर गेले अनेक दिवस कायम असलेला चंद्रपूरमधील महापौर, उपमहापौर निवडीसोबतच काँग्रेसची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज गुरुवारी (दि.५) नामांकन दाखल करण्याचा दिवस असल्याने वडेट्टीवार गटाच्या बारीकसारीक हालचालींवर खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे तसेच भाजपचे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात आजची महत्वाची घटना म्हणजे वडेट्टीवार गटाने काल दाखल केलेली आपली याचिका मागे घेतली आहे. काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाकडून नागपुरातील विभागीय आयुक्त यांच्या विरोधात ही याचिका टाकण्यात आली होती. काँग्रेसमधील दोन वेगवेगळ्या अर्जांवर विभागीय आयुक्तांनी आक्षेप घेत काही त्रुटी सुचवल्या होत्या. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसकडून सचिन कात्याल यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती.

काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून घेतलेल्या निर्णयामुळे अंतर्गत तिढा सुटल्याने ती याचिका मागे घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. चंद्रपूर येथे आज दुपारी तीन वाजेपर्यंत नाम निर्देशन दाखल करायचे आहे. पक्ष श्रेष्ठींनी सुचविलेल्या प्रमाणे वडेट्टीवार गटाकडून उपमहापौर पदासाठी आणि धानोरकर गटाकडून महापौर पदासाठी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यामुळेच आज वडेट्टीवार गटाने स्वतंत्रपणे महापौर पदावर उमेदवार उभा केला नाही तर गेले अनेक दिवस कायम असलेला चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला असे म्हणता येईल. उबाठा गटाला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news