BJP Target 120 | गडकरींच्या उपस्थितीत भाजपाचा विजयाचा संकल्प : ‘टार्गेट 120’ साध्य करण्याचा निर्धार

Nagpur Municipal Carporation | आगामी नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात
BJP Target 120
अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी यांनी गडकरींच्या निवासस्थानी भेट घेतली.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

BJP Nagpur Strategy

नागपूर : भाजपाने आगामी नागपूर महानगर पालिका निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असून “टार्गेट 120” हे ध्येय साध्य करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नुकतीच भाजपा नागपूर महानगराची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी गडकरींच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीस गेले.

यावेळी गडकरींनी पक्ष मजबूत करण्यासाठी आवश्यक संघटनात्मक कामकाज, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मोहिमा आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर भर दिला. तसेच “महानगर पालिकेच्या निवडणुकीत 120 सदस्य निवडून आणण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण करता येईल” याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीत अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह महामंत्री संदीप जाधव, श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, मनिषा धावडे, संपर्क मंत्री विष्णू चांगदे, बाल्या बोरकर, तसेच इतर उपाध्यक्ष, मंत्री आणि आघाडी अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेत आगामी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

टार्गेट 120 वर भर

भाजपाने मनपा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी 120 सदस्य निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यासाठी संघटन मजबूत करणे, नागरिकांशी थेट संपर्क वाढवणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या धोरणांवर भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news