भंडारा: तुमसर वनपरिक्षेत्रातील वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक

Bhandara Tigress Death | वाघाच्या मृत्यूची आठवड्यातील दुसरी घटना
Bhandara Tigress Death
प्रातिनिधिक छयाचित्र File Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रातील झांजरिया जंगलात तलावाजवळ तीन वर्षे वयाच्या वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे आढळल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी या वाघिणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या वाघिणीचा विद्युत प्रवाहाने मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले होते. वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. तालुक्यातील वाघाच्या मृत्यूची आठवड्यातील दुसरी घटना आहे. झांजरियाच्या कक्ष क्रमांक 74 बीआरएफ मध्ये या तलावाच्या बांधालगत ही वाघीण मृत अवस्थेत आढळून आली होती.

Bhandara Tigress Death
पवनी अभयारण्यात वाघिणीसह ५ बछड्यांना घेरले: चालक, गाइड निलंबित; पर्यटकांवर आजन्म बंदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news