नागपुरात हरवलेल्या मुलासाठी मेट्रो कर्मचारी ठरले देवदूत

Nagpur News | भाषेचा अडसर, पण माणुसकीने केली सुटका!
नागपूर मेट्रो स्थानकावर हरवलेल्या मुलासाठी कर्मचारी ठरले देवदूत
नागपूर मेट्रो स्थानकावर हरवलेल्या मुलासाठी कर्मचारी ठरले देवदूतfile photo
Published on
Updated on

नागपूर – नागपूर मेट्रो स्थानकावर एक १४ वर्षीय बंगाली भाषिक मुलगा वाट चुकून पोहोचला. हिंदी किंवा अन्य स्थानिक भाषा येत नसल्याने त्याला मेट्रो कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात अडथळा येत होता. मात्र, मेट्रो अधिकाऱ्यांनी वेळेवर घेतलेली तातडीची व सहृदय कारवाई दिलासा देणारी ठरली.

बिनोद (नाव बदललेले) नावाचा मुलगा दोसर वैश्य चौक मेट्रो स्थानकावरील तिकिट खिडकीवर पोहोचला. त्याला बंगाली व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा न येत असल्याने संवाद कठीण झाला. यावेळी स्टेशन कंट्रोलर शुभम बडोले यांनी पुढे येत ओळख पटवून घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्रीमती आशा सोनकुसरे (सफाई कर्मचारी, कॉटन मार्केट) या बंगाली भाषिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. बिनोदने सांगितले की, त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क तुटला असून, तो रेल्वे स्थानक शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. याची माहिती सुरक्षा विभागाचे निरीक्षक गणेश गारकळ यांना देण्यात आली. त्यानंतर बिनोदला नागपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोलिस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले.

बिनोद हा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील महिपालपूर येथील रहिवासी असून, त्याला एफएमएस पर्यवेक्षक प्रेमदास बोरकर यांच्या हस्ते चाईल्डलाइन अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. चाईल्डलाइनने तातडीने त्याच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news